शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेंटिस भरती मेळावा

    02-Jul-2024
Total Views |
apprentice recruitment in government industrial training institute
 
चंद्रपूर :
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अप्रेंटीस भरती मेळावा नुकताच घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून बीटीआरआय विभागाच्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजीनगर येथील इगल हायटेक कंपनीचे सुनील राठोड, नागपूर येथील वैभव एन्टरप्राईजेसचे पराग कपाळे, जय महाराष्ट्र कंपनीचे नडे, राईट वॉक फाउंडेशनचे प्रतिनिधी कपिल बांबोळे आदी उपस्थित होते.
 
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थांना अप्रेंटीशीपच्या माध्यमातून कंपनीत काम करण्याची संधी मिळत असते. या संधीचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य आर.बी. वानखेडे यांनी केले तर बीटीआरआय विभागासंबंधित महत्त्वाची माहिती प्रणाली दहाटे यांनी दिली.
 
प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी केले. संचालन अर्पिता घाघरगुंडे यांनी केले तर आभार दोरखंडे यांनी मानले. यावेळी गटनिदेशक एन. एन. गेडकर, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, लेडांगे आदींची उपस्थिती होती.