सहलीसाठी गेलेल्या तरुणाचा पेंच नदीत बुडून मृत्यू

19 Jul 2024 14:08:17

Young man drowned in Pench river(Image Source : Internet/ Representative) 
 
नागपूर :
शहरातील मित्रांसोबत सहलीसाठी गेलेल्या तरुणाचा बुधवारी सायंकाळी पेंच नदीत बुडून मृत्यू झाला. रोशन श्रावण पार्टेती (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. पारशिवनी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तरुणाचा मृतेदह नदी बाहेर काढून घटनेची नोंद घेतली.
 
रोशन हा नागपूरच्या छत्रपती चौकातील बिअर बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी 'ड्राय डे' असल्याने बिअर बार, दारूची दुकाने बंद होती. त्यामुळे रोशन आणि त्याचे पाच मित्र पारशिवनी तालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथे सहलीसाठी गेला. रोशन व त्याचे मित्र पेंच नदीजवळील मंदिराच्या मागील भागात फिरायला निघाले. रोशन तलावाच्या काठावर जाऊन उभा असता त्यांना नदीत आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. मात्र नीट पोहता येत नसल्याने रोशनचा तलावात बुडून मृत्यू झाला.
Powered By Sangraha 9.0