स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

19 Jul 2024 19:03:37
 
Transfer of working teachers to be done before posting
(Image Source : Internet)
 
वाडी :
वडधामना येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या परिसरात जेसीआय नागपूर गोंडवाना या संस्थेच्या वतीने १०० वृक्षांचे वृक्षरोपण केले. शाळेच्या वतीने १०० वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक पुरुषोत्तम कामडी यांनी घेतली. यावेळी जेसीआयच्या अध्यक्षा आस्था हजारे, झोन आएक्सच्या उपाध्यक्षा जेसीआय सेनेटर कस्तूरी बावणे, शाळेचे मुख्याध्यापक पुरूषोत्तम कामडी उपस्थित होते. आयोजनासाठी सुधांशू, नरेंद्र, वेदांत, विश्वजीत, अंकीत, चतश, मिठू, सपना आदींनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0