रामटेक वारसा स्थळांचा आयआरएस अधिकाऱ्यांनी केला अभ्यास दौरा

19 Jul 2024 19:46:29

Study tour of Ramtek heritage sites by IRS officials
 
नागपूर :
राष्‍ट्रीय प्रत्‍यक्ष कर अकादमीच्‍या महसूल अधिकाऱ्यांचा रामटेक वारसा स्‍थळांचा अभ्‍यास दौरा उत्‍साहात पार पडला. प्रशिक्षणाचा भाग म्‍हणून आयआरएस अधिकारी प्रशिक्षणार्थींनी मनसर उत्खनन, गड मंदिर आणि कपूर बावडी हेरिटेज ट्रेल यासारख्या महत्त्वाच्या वारसा स्थळांना भेट दिली.
 
सीएससी ऑलराऊंडरच्‍या नयनरम्य कॅम्प चेरी फार्म येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या या अभ्‍यास दौ-यात प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी हेरिटेज ट्रेकिंग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. अधिकाऱ्यांली या दौ-यादरम्‍यान समृद्ध, साहसी अनुभव तर घेतलाच शिवाय, या प्रदेशाती समृद्ध इतिहासाची आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून घेतली.

Study tour of Ramtek heritage sites by IRS officials
 
ट्रेकिंग व्यतिरिक्त, त्यांनी विविध सॉफ्ट ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये तसेच, टीम बिल्डिंग, हाय-रोप कोर्स, कृत्रिम क्लाइंबिंग वॉल, तिरंदाजी आणि रायफल शूटिंगमध्‍येही सहभाग घेतला.
 
एनएडीटीचे एसीडी-1 व उपसंचालक अभिनव मिश्रा व सहसंचालक हरेंद्र कुमार वर्मा यांच्‍या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले. हे शिबीराच्‍या यशस्‍वीतेसाठी सीएसी-ऑलराउंडरचे संचालक अमोल खंते, अजय गायकवाड, गजानन रिंधे, मनीष मख आणि संदेश दांडेकर यांचे सहकार्य लाभले.
Powered By Sangraha 9.0