शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा; चिन्हाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

19 Jul 2024 16:54:03
Sharad Pawar
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे शरद पवारांनी पिपाणी चिन्ह रद्द करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेर ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली असून हा विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटासाठी मोठा दिलासा मनाला जात आहे.
 
पिपाणी हे चिन्ह तुतारी सारखेच दिसत असल्यामुळे शरद पवार गटाचा नाशिक लोकसभा मतदार संघाचा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पिपाणी चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या या मागणीची दखल निवडणूक आयोगाने घेत पिपाणी चिन्ह गोठवले आहे.
Powered By Sangraha 9.0