शरद पवारांच्या 'या' खेळीने नगरमध्ये अजित पवार आणि भाजपची डोकेदुखी वाढली

19 Jul 2024 18:26:07

sharad pawar game increased the headache of ajit pawar and bjp
 
 
अहमदनगर :
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ठिकठिकणी दौरे सुरु केले आहेत.
 
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे शरद पवारांची आज सभा पार पडली. तिथे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्याविरोधात आपल्या उमेदवाराची शरद पवारांनी जवळपास घोषणा केली आहे. शरद पवार यांनी अहमदनगरच्या अकोले येथील सभेमध्ये नवीन डाव टाकला आहे. शरद पवारांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव मधुकर पिचड यांची डोकेदुखी वाढली आहे. अकोले विधानसभेत अमित भांगरे यांना बळ द्या, असे म्हणत शरद पवारांनी एकप्रकारे आपला उमेदवारच घोषित केल्याची माहिती समोर येत आहे.
Powered By Sangraha 9.0