कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ७ गोवंशीय जनावरांची सुटका; जुनी कामठी पोलिसांची कामगिरी

19 Jul 2024 19:34:37

Rescue of 7 bovine animals held for slaughter
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
शहरातील जुनी कामठी परिसरात कत्तलीसाठी निर्दयपणे गोवंश डांबून ठेवणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ गोवंशाच्या जनावरांची सुटका केली आहे.
 
माहितीनुसार, जुनी कामठी पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान कमसरी बाजारच्या मोकळ्या मैदानात झाडी झुडपात लपून बसलेल्या एका इसमाच्या हालचालीवर संशय आला. मात्र पोलिसांना पाहून त्याने त्याठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी याठिकाणी पाहणी केली असताना ७ गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून ठेवल्याचे दिसून आले. या जनावरासंदर्भात आजूबाजूच्या लोकांना पोलिसांनी विचारपूस केली असता ही जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याचे त्यांना माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्या ७ गोवंशीय जनावरांची किंमत एकूण ७० हजार असून त्यांचीही सुटका करून त्यांची रवानगी गोशाळेत केली आहे.
Powered By Sangraha 9.0