पूजा खेडकर प्रकरण : राज्य सरकारने तपास अहवाल केला सादर

19 Jul 2024 13:04:17
Pooja Khedkar
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणी महाराष्ट्र सरकारने आपला तपास अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. आठवडाभराच्या तपासानंतर, महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गराडे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र सरकारच्या समितीने आपला अहवाल केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग तसेच केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीला पाठवला आहे.
 
हेही वाचा :  वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरच्या आईला अटक; नेमक प्रकरण काय?
 
केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या विरोधात दोन आठवड्यात चौकशी करून अहवाल सादर करायचा आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या तपास अहवालात विविध एजन्सींकडून मिळालेली कागदपत्रेही जोडली आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा खेडकर दोषी आढळल्यास तिला बडतर्फ केले जाऊ शकते. याशिवाय तथ्य लपवणे आणि खोटी विधाने केल्याबद्दल त्याच्यावर फौजदारी कारवाईही होऊ शकते.
Powered By Sangraha 9.0