अखेर हार्दिक पंड्या-नताशाच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब; दोघांनीही पोस्ट करत दिली माहिती

19 Jul 2024 15:25:39
Hardik Pandya and Natasa Divorce Finalized
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून दोघांना 3 वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव अगस्त्य आहे. नताशा ही भारत सोडून तिच्या देशात परतली आहे. गेली ४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
 
 
 
आम्ही एकत्र आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आणि आमचे सर्व काही दिले आणि आम्हाला विश्वास आहे हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. आम्ही एकत्र घालवलेला वेळ, एकमेकांविषयी असलेला आदर आणि कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठिण असल्याचे दोघांनीही पोस्टमध्ये म्हटले आहे. अगस्त्यामुळे आमच्या दोघांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी राहील. सहपालक म्हणून त्याच्यासाठी जे काही करता येईल ते करू. या कठिण काळात तुम्ही आम्हाला प्रायव्हसी द्याल आणि समजून घेताल यासाठी विनंती करतो, असे दोघेही पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
Powered By Sangraha 9.0