विजापूर आणि तेलंगणा सीमेवर चकमक; एक नक्षलवादी ठार, अनेकजण जखमी

19 Jul 2024 18:06:54
chattisgadh army
  (Image Source : Internet/ Representative)
 
छत्तीसगड :
विजापूर जिल्ह्यातील उसूर ब्लॉकमधील सेमलदोडीच्या जंगलात तेलंगणाच्या ग्रेहाऊंड फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत अनेक नक्षलवादी मारले गेले असल्याची माहिती समोर आली असून एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला आहे. तसेच त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील उसूर ब्लॉकमधील सेमलदोडी गावाच्या जंगलात तेलंगणाच्या ग्रेहाऊंड फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत ग्रेहाऊंडच्या जवानांनी अनेक नक्षलवाद्यांचा खातमा केल्याचे वृत्त आहे. या घटनेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सेमलदोडी जंगलात नक्षलवाद्यांचे मोठे कॅडर असल्याची माहिती ग्रेहाऊंड्स टीमला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
 
गेल्या 24 तासांत दंतेवाडा, विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयईडी स्फोट झाल्यामुळे दोन जवान शहीद झाले असून 6 जवान जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 2 डीआरजी जवान आहेत, तर बाकीचे एसटीएफचे आहेत. येथे दंतेवाडा पोलिसांशी झालेल्या चकमकीत जवानांनी एका महिला माओवाद्याचा खातमा केला आहे. या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर दरभा विभाग, पश्चिम बस्तर विभाग आणि लष्करी क्रमांक 2 मधील नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे DRG, STF, बस्तर फायटर आणि CRPF या तिन्ही जिल्ह्यांतील जवानांना 16 जुलै रोजी शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0