राकांपा शरदचंद्र पवार नागपूरतर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिनिमित्त आदरांजली

18 Jul 2024 19:05:17
Chandrapur
(Image Source : Internet)
नागपूर : 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Chandra Pawar) नागपूर शहर गुरुवार १८ जुलै रोजी दीक्षाभूमी चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त माजी गृहमंत्री आमदार मा. अनिल देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
 
यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले की, तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी लोककवी, लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
 
यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, शेखर सावरबांधे, पंजक ठाकरे, किशोर बेलसरे, रेखा खूपाले, शैलेंद्र तिवारी रविनिष पांडे, राजा बेग, महेंद्र भांगे, राजू सिंग चौव्हाण, आशुतोष बेलेकर, शेखर पाटील,उषा चौधरी, सोनाली भोयर, नसीम सिद्दिकी, हर्षद अंसारी, उत्कर्ष गाडबैल, लीना पाटील, विनय मदलियार, सारंग साखरे, संजय आग्रे, यशश्री बनसोड, शशिकला भोंगळे, बिंदू मडावी, जिजा वाघमारे, सीता सनेश्वर, निशांत मेश्राम, गोलू कुंडे, संजय परयानी, मितराज चव्हाण, रमेश नाईक,सुनील मेश्राम, प्रवेश मेश्राम, प्रफुल डांगे, सुनील मेश्राम, आकाश चिमणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0