ज्वारी खरेदीचे पोर्टल सुरु

18 Jul 2024 21:27:15
 
Sorghum purchase
 
बुलडाणा :
ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारीची खरेदी सुरू करण्यात आली आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये राज्य शासनातर्फे ज्वारी खरेदीचेपोर्टल 27 जून 2024 पासून बंद होते. सदर ऑनलाईन पोर्टल 15 जुलै 2024 पासून सुरु झाले आहे.
 
शेतकऱ्यांना एसएमएस येईल, अशा शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर शेतमाल घेऊन जावे. तसेच खरेदी संदर्भात अडचण असल्यास अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे, संपर्क क्रमांक 9421493761, प्रतिनिधी बाबाराव सुर्यवंशी संपर्क क्रमांक 8108908978 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0