शरद पवार हे नटसम्राट तर भुजबळ हे फिरत्या रंगमंचावरचे कलाकार; संजय राऊतांचे विधान

18 Jul 2024 15:07:01

Sanjay Raut criticizes Chhagan Bhujbal
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे फिरत्या रंगमंचावरचे कलाकार असल्याचे राऊत म्हणाले.
 
भुजबळ अचानक शरद पवारांकडे कसे गेले? त्यानंतर राज्याच्या राजकारणात हंगामा झाला, हे सर्वांना माहीत आहेच. पण शरद पवार सर्वात मोठे नटसम्राट आहेत. त्यांना राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे पुढे काय होईल, हे सर्वांनी पाहावे. महाराष्ट्रात एक फिरता रंगमंच होता. छगन भुजबळ सारखे लोक याच फिरता रंगमंचाचे कलाकार आहेत,अशी टीका राऊत यांनी केली.
 
दरम्यान राऊत यांनी लाडका भाऊ योजनेवरून सरकारला धारेवर धरले. लाडक्या बारावी पास बेरोजगार भावाला महिना सहा हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे. पदवीधर बेरोजगाराला दहा हजार भत्ता मिळणार आहे. पण लाडकी बहिण खऱ्या अर्थाने घर चालवते. मग लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये का?असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
Powered By Sangraha 9.0