'आपली बस' वाहकांना नियमांनुसार महागाई भत्ता घ्यावा: आ. प्रवीण दटके

18 Jul 2024 19:49:55
 
Praveen Datke
 
नागपूर :
नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाद्वारे संचालित 'आपली बस' मध्ये कार्यरत वाहकांना बस चालकांप्रमाणे नियमांनुसार महागाई भत्ता आणि इतर सुविधा देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली.
 
नागपूर महानगरपालिकेतील आयुक्त सभा कक्षात 'आपली बस' संदर्भात आमदार प्रवीण दटके यांनी आढावा घेतला. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मनपा परिवहन विभाग प्रमुख गणेश राठोड, परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, माजी नगरसेवक नागेश सहारे, आपली बस संघटनेचे सचिव कमलेश वानखेडे, सुमित चिमोटे, निलेश पौनिकर, संदेश डोगरे, प्रवीण काटोले, प्रवीण नरवने, संजय कळसकर, विक्की चौधरी, इसलाउद्दिन फैजी, सोमेश्वर गुगल, आदी उपस्थित होते.
 
बैठकीत आमदार प्रवीण दटके यांनी आपली बस चालक आणि वाहक यांच्यासह कर्मचाऱ्यांना २०१५चा अध्यादेश लागू करून त्या नुसार पगार व महागाई भत्ता देण्यात यावा, बस वाहक यांचे ८ तासांच्यावर काम झाल्यास नियमानुसार भत्ते देण्यात यावे, जर एखाद्या कर्मचाऱ्यांवर चौकशी करायची असल्यास 'निष्पक्षपाती चौकशी अधिकारी' नेमून त्यामार्फत चौकशी करण्यात यावी, आदी मागणी केली. मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
Powered By Sangraha 9.0