कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खातमा

18 Jul 2024 17:50:10

Encounter between security forces and terrorists in Kupwara
 (Image Source : Internet/ Representative)
 
श्रीनगर :
जम्मू काश्मीरमधील जम्मू विभागाच्या डोडानंतर आता उत्तर काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. केरन सेक्टरच्या सीमा भागात भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ (LOC) आज सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांचा खातमा करण्यात यश आले.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, केरनच्या सीमा भागात नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. लष्कराचे 6 आरआर आणि पोलिसांचे एसओजीचे जवान घटनास्थळी तैनात आहेत. यावेळी जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला.
 
दोडा येथे दोन जवान जखमी
याआधी आज जम्मूच्या डोडा अंतर्गत कास्तीगडमध्येही सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा सामना केला होता. येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. यापैकी एक जवान गंभीर जखमी झाला असून तो आता धोक्याबाहेर आहे. या घटनेनंतर जवानांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.
 
 
याबाबत बोलताना रामबन-दोडा रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीधर पाटील म्हणाले की, आमची शोध मोहीम अजूनही सुरू असल्याने मी अधिक तपशील सांगू शकत नाही. आम्ही लवकरच यात यशस्वी होऊ.
 
Powered By Sangraha 9.0