नागपूर सुधार प्रन्यासच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात काँग्रेसचे एनआयटीसमोर आंदोलन

18 Jul 2024 18:34:49

Congress protests in front of NIT
 
 
नागपूर :
नागपूर शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी विकासक म्हणून काम करणाऱ्या नागपूर सुधार ट्रस्टला सध्या भ्रष्टाचाराने घेरले असून, नागरिकांची कामे मध्यस्थांशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांकडून लाखो रुपये जमा करूनही नासुप्र अंतर्गत ले-आऊटमध्ये कोणतेही विकासकाम झालेले नाही. नागपूर सुधार प्रन्यास नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एनआयटी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
 
नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी एनआयटीच्या विश्वस्तांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत आपली कार्यशैली बदलावी याबाबत एनआयटी अध्यक्षांना निवेदन दिले.
 
काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
Powered By Sangraha 9.0