बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल; असे आहे कारण

18 Jul 2024 19:24:19

Janhvi Kapoor admitted to hospital
 (Image Source : Internet)
 
मुंबई : 
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. जान्हवीला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जान्हवीला अचानक अस्वस्थ आणि अशक्तपणा जाणवू लागला. गुरुवारी तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. जान्हवीला अन्नातून विषबाधा झाली असल्याची बातमी तिच्या जवळच्या मैत्रिणीने दिली आहे. याशिवाय तिने आपली सर्व कामे देखील पुढे ढकलल्याची माहिती जान्हवीच्या मैत्रिणीने दिली.
 
शुक्रवारी मिळू शकतो डिस्चार्ज
रिपोर्ट्सनुसार, जान्हवीच्या तिच्या मैत्रिणीने असेही सांगितले की, अभिनेत्रीला शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. मात्र, जान्हवीकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Powered By Sangraha 9.0