भाजपचा कार्यकर्ता ‘सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी' काम करणारा: सुधीर मुनगंटीवार

18 Jul 2024 18:37:01
Sudhir Mungantiwar                                                                (Image Source : Internet/ Representative)
चंद्रपूर :
एकीकडे विरोधी पक्ष केवळ सत्तेच्या हव्यासापोठी समाजात जातीभेदाचे वीष पसरवित आहेत. आणि दुसरीकडे देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपा जनसेवेच्या भूमिकेतून काम करीत आहे. कारण भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी काम करतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केले.
 
भाजपा महिला मोर्चाच्या बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ नेत्या वनिताताई कानडे, प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम, स्वाती देवाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोढे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वंदनाताई शेंडे, महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, लक्ष्मीताई सागर, प्रियाताई लांबट, पोंभूर्णा नगराध्यक्ष सुलभा पिपरे, वंदना आगरकोठे, ॲड. अरुणा जांभुळकर, रंजना मडावी, सुरेखा श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0