अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

17 Jul 2024 22:45:19
 
Accident
 
अमरावती :
परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोंडगाव गेट येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. देवानंद माणिकराव नागतोडे (47, धोतरखेडा) असे मृताचे नाव आहे. ही घटना 13 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली. मृताचा भाऊ अविनाश माणिकराव नागतोडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धोतरखेडा येथील रहिवासी असलेले देवानंद यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. या घटनेची माहिती रुग्णवाहिका चालक शुभमने अविनाश नागतोडे यांना दिली. त्यानंतर अविनाशने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन देवानंदला तत्काळ रुग्णालयात नेले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अविनाशच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0