व्हॉट्सॲपने आणले भन्नाट फिचर

17 Jul 2024 15:24:45
 
WhatsApp brought an amazing feature
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी नवनवीन वैशिष्ट्ये सादर करीत असतो. अलीकडेच कंपनीने चॅट फिल्टर फीचर सादर केले आहे. आता व्हॉट्सॲप 'फेव्हरेट' फिल्टर नावाचे आणखी एक नवीन फीचर आणत आहे.
 
फेव्हरेट फिल्टर नेमक काय?
आपण व्हॉट्सॲपद्वारे दररोज मित्र, ऑफिसचे सहकारी आणि नातेवाईकांसह अनेक संदेशांची देवाणघेवाण करीत असतो असत असतांना कधीकधी एखादा महत्त्वाचा संदेश शोधणे कठीण होते. हे सोपे करण्यासाठी व्हॉट्सॲपने फेव्हरेट चॅट फिल्टर फीचर नावाचे नवीन फीचर आणले आहे. चॅट फिल्टर वैशिष्ट्य आपल्याला तीन प्री-सेट फिल्टर वापरून आपण आपले विशिष्ट चॅट्स सहजपणे शोधू शकू.
 
असे वापरा फेव्हरेट फिल्टर
- सर्वप्रथम व्हॉट्सॲप अपडेट करावे लागेल
- त्यानंतर सेटिंग ऑप्शनवर जा
- सेटिंग मध्ये फेव्हरेट चा पर्याय मिळेल
- यानंतर तुम्हाला Add to favorites वर क्लिक करावे लागेल
- वापरकर्ते त्यांना हवे असल्यास त्यांची आवडती चॅट लिस्ट कधीही बदलू शकतात.
Powered By Sangraha 9.0