Punjab : पोलिसांचा छापा पाहून स्पा सेंटरमधील मुलींनी चौथ्या मजल्यावरून मारली उडी

17 Jul 2024 18:43:46

Two foreign girls jump off a 4th floor spa centre
(Image Source : Internet/ Representative)
 
अमृतसर :
अमृतसर येथे बसस्थानकाजवळील हॉटेल रॉयल शेल्टरच्या चौथ्या मजल्यावर सुरू असलेल्या स्पा सेंटरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. या सेंटरमध्ये पोलिसांनी छापा घातल्यावर पोलिसांना घाबरून दोन तरुणींनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत एका मुलीचा मणका तुटला, तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही तरुणींवर गुरुनानक देव रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 
या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पोलिसांचा ताफा हॉटेलवर पोहचला. पोलिसांना पाहून दोन्ही तरुणी घाबरल्या आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही तरुणी थायलंडमधील असल्याचे समोर आले आहे.
 
या संपूर्ण घटनेनंतर हॉटेलमध्ये लावलेले सीसीटीव्ही गायब करण्यात आले. सीसीटीव्हीबाबत हॉटेलचे कर्मचारी किंवा पोलिस काहीही बोलायला तयार नव्हते. रुग्णालयात दाखल झालेल्या मुलींशी मीडियाने बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपली ओळख सांगण्यास नकार दिला. याविषयी बोलण्याची इच्छा नसल्याचेही त्या म्हणाल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी सीपी रणजीत सिंह ढिल्लन आणि डीसीपी हरप्रीत सिंह मंदर यांना माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0