'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये 'या' कलाकाराचे होणार पुनरागमन

    17-Jul-2024
Total Views |

Taarak Mehta ka ooltah chashmah
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
एकेकाळी छोट्या पडद्यावर अर्थात टीव्हीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta ka ooltah chashma) मालिकेच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. हा कार्यक्रम कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आवडता कार्यक्रम आहे. या मालिकेतील पात्र आपल्या मजेशीर अभिनयामुळे नेहमीच चाहत्यांना हसवत असतात. संपूर्ण देशातच नव्हे तर विदेशातही या मालिकेचे लाखो चाहते आहेत. घराघरात पहिली जाणारी ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रत्येकाची पहिली पसंती बनली आहे.
 
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा बऱ्याच काळापासून लोकप्रिय शो आहे. आजही लोकांना हा शो पाहायला आवडतो. अनेक प्रसिद्ध पात्रांनी शो सोडला असला तरी ते अजूनही चर्चेत आहेत. दरम्यान, शोमध्ये एक जुनी कलाकार पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे.
 
तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमात रोषण सिंह सोधीची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेल्या गुरुचरण सिंग यांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. पण 2020 मध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने हा शो सोडला. पण अलीकडेच गुरुचरण सिंग यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर निर्माता असित मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी त्यांच्या भेटीनंतर त्याच्या मालिकेत पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे.