विधानसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

17 Jul 2024 17:13:34

Thackeray groups strategy for assembly elections
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या शिवसेनेची ताकद आहे. ते मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा आग्रह या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केला.
 
हेही वाचा : अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर 
 
राज्यातील 120 पेक्षा अधिक विधानसभांच्या जागांचा आढावा ठाकरे गटाच्या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटप झाल्यास 90 ते 100 जागांवर शिवसेना ठाकरे गट आपले उमेदवार देतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. जे विधानसभा मतदार संघ ठाकरेंचे पारंपारिक मतदारसंघ आहेत तिथे संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागण्याचे आवाहनही बैटकीत करण्यात आले आहे.
 
हेही वाचा : उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री होवोत हीच इच्छा; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे विधान
Powered By Sangraha 9.0