शरद पवार ॲक्शन मोडवर; नाशिकमधून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

17 Jul 2024 17:04:48

Sharad Pawar
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पवार ॲक्शन मोडवर आले आहे. यापार्श्वभूमीवर ते हे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
 
यादरम्यान कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला ते हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून पवार काय संदेश देतात याची राजकीय नेत्यांना उत्सुकता आहे. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून ते नाशकातूनच आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे जुने सहकारी आणि सहकार क्षेत्रातील नेते दिवंगत मालोजीराव मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथी एकाच दिवशी आहे. त्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा येथे हा मेळावा होत आहे.
Powered By Sangraha 9.0