ओमान तेल दुर्घटना: जहाजातील १३ भारतीयांसह संपूर्ण क्रू बेपत्ता

17 Jul 2024 17:37:57
Oman Oil Disaster
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
सोमवार आणि मंगळवारच्या रात्री ओमानच्या किनारपट्टीलगत तेलाने भरलेला टँकर उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेत जहाजावर असणारे संपूर्ण क्रू बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे. तेलाचा टँकर उलटल्याने १३ भारतीयांसह एकूण १६ जणांचा संपूर्ण क्रू समुद्रात बेपत्ता झाला आहे.
 
हेही वाचा : AAP च्या कार्यालयासंदर्भात केंद्र सरकारने १० दिवसांत निर्णय घ्यावा 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या किनारपट्टीलगत तेलाने भरलेला टँकर उलटल्याने जहाजावरील १३ भारतीयांसोबतच तीन श्रीलंकन नागरिकांचा समावेश असणारे संपूर्ण क्रू बेपत्ता झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य कार्याला सुरुवात केली. ओमानच्या किनारपट्टीवर बुडालेल्या ऑईल टँकरवर आफ्रिकेच्या कोमोरोस देशाचा झेंडा आहे. प्रेस्टिज फाल्कन असे बुडालेल्या ऑईल टँकरचे नाव आहे. ऑईल टँकरमधील १६ क्रू मेंबर्स अद्याप बेपत्ता आहेत. ऑईल टँकर बुडाल्यानंतर सागरी सुरक्षा केंद्राने (एमएससी) मंगळवारी याची माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0