शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख राजू भोस्कर यांच्या प्रयत्नांना यश; नवे मतदान केंद्र सुरू होणार

17 Jul 2024 17:21:41
 
Raju Bhoskar
 
रामटेक :
पारशिवनी तहसील कार्यालयात विधानसभा निवडणूक २०२४ सुसुत्रीकरण संदर्भात १२ जुलैला रामटेक तालुक्यातील राजकिय पक्षाची सभा घेण्यात आली. या सभेत तालुक्यातील ३ नविन मतदान केंद्र, ५ अन्य जागेवरून स्थानांतरीत केलेले मतदान केंद्र सुरू करण्यात येणार अशी घोषणा निवडणूक आयोगा मार्फत तहसिलदार पारशिवनी यांनी केली.
 
पारशिवनी तालुक्यात गट ग्राम पंचायत आमडी हिवरी अंतर्गत गावातील लोकसभा व विधानसभेचे मतदान रामटेक तालुक्यातील हिवरा ग्राम पंचायत येथील मतदान केंद्रात होत होते. या विषयी निवडणूक आयोगाला राजू भोस्कर यांनी पाठपुरावा करून रामटेकचे आमदार यांना पत्रव्यवहार करून आयोगाची ही चुक लक्षात आणून दिली, आता हिवरी येथे स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्याचे आदेश तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहे.
Powered By Sangraha 9.0