विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव का झाला? शरद पवार म्हणाले...

17 Jul 2024 20:43:22
 
Sharad Pawar on Jayant Patil
 (Image Source : Internet)
पुणे :
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत शरद पवार यांचा पाठींबा असलेल्या जयंत पाटील यांचा परभाव झाला. या निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
 
हेही वाचा : अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर 
जयंत पाटील यांच्याबद्दल आमचा (महाविकास आघाडी) एकत्र निर्णय झाला नव्हता. आम्ही लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. शेतकरी कामगार पक्षानं लोकसभेसाठी जागा मागितली होती. त्यावेळी जागा देता येत नव्हती म्हणून विधान परिषदेत जयंत पाटील यांना संधी दिली.
आमच्याकडे 12 मतं होती. उद्धव ठाकरेंनी त्यांचा उमेदवार दिला. काँग्रेसनं पहिल्या पसंतीची मतं घ्यावी. दुसऱ्या क्रमांकाची मत इतर दोन्ही उमेदवारांना समसमान द्यावी, असा प्रस्ताव मी सांगितला होती. मी दिलेले गणित काँग्रेसला मान्य झाले नाही. मी सांगितले असते तसे झाले असते तर आमचा उमेदवार विजयी झाला असता. विधानपरिषद निवडणुकीत आमची रणनिती चुकली, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0