'कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर'चे लोकार्पण आज

17 Jul 2024 12:07:57

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
 
Inauguration of Command and Control Center today
(Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड व नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थापित 'कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर' नागपूरचा लोकार्पण आणि नागपूर शहर पोलीसांकडून फिर्यादींचे जप्त मुद्देमालांचा 'मुद्देमाल हस्तांतरण' सोहळ्याचे आयोजन बुधवार १७ जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे.
 
पोलीस कंट्रोल रूम, 'कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर, प्रशासकीय इमारत क्र.२ च्या मागे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहेत. याप्रसंगी सर्वश्री प्रवीण दटके, आ. अभिजीत वंजारी, आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर अडबाले,आ. कृपाल तुमाने, आ. डॉ. परिणय फुके, डॉ. नितीन राऊत, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, विकास ठाकरे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
 
कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येत नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0