तहसील कार्यालयातील कारकून संपावर गेल्याने अनेक कामे बंद

17 Jul 2024 22:11:57
- लाडकी बहिण योजनेला फटका

strike 
नागभीड :
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयातील कारकून संपावर गेल्याने सकारात्मक मागण्या मान्य न झाल्याने बे मुदत आंदोलन १५ जून पासून तहसील कार्यालया समोर काळ या फिती लावून, लेखणी बंद बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.
 
नागभीड तहसील कार्यालयातील कारकून विभागातील सर्व कर्मचारी १५ जून रोजी कार्यालयाचे प्रवेश द्धार समोर आंदोलन करीत आहे यामध्ये दांगट समितीच्या अहवालातील शिफारशी नुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न लागू करण्यात यावा, अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गा तून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देणेबाबत, पुरवठा विभागातील लिपिक, टंकलेखक, अव्वल कारकून/पुरवठा निरीक्षक यांची पदे सरळ सेवा भरती करण्यात येत असून सदर पदाचा सरळ सेवा परीक्षेचा निकाल लावावा, संजय गांधी योजना, रो ह यो, निर्वाचन आयोग व इतर तत्सम विभागाचे वेतन देयके उने प्रतिकार पत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. महसूल सहाय्यक व तलाठी यांचा ग्रेड पे २४००/करण्यात यावा. सेवा नियमित होण्यासाठी एकच परीक्षा घेतली जावी. वित्त विभाग अधिसूचनेनुसार, महा नागरी सेवा २००९ मधील नियम १३ नुसार लागू करण्यात यावे अशा विविध मागण्या मान्य न झाल्याने बेमुत लेखणी बंद आंदोलन सुरू असून याचा फटका विद्यार्थी दाखले व लाडकी बहिण योजनेला बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0