त्या बालकाचा मृतदेह सापडला

17 Jul 2024 22:50:50
- लालखडी परिसरात शोककळा

Dead body 
अमरावती :
रविवारी दुपारी शहरातील लालखडी परिसरात राहणारा परवेज खान अफरोज खान (14) पाणी प्रवाहात वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरु होती. परंतू त्याचा पत्ता लागला नाही. अखेर सोमवारी सकाळी परवेज खानचा मृतदेह काही अंतरावरील हातुर्णा गावातील नाल्याजवळ दिसला.
 
पावसामुळे रविवारी शहरासह ग्रामीण भागात पाणी साचले होते. पाऊस थांबल्यानंतर लालखडी परिसरातील काही मुले क्रिकेट खेळत होती. दरम्यान, खेळता-खेळता चेंडू नाल्यातील पाण्यात पडला. त्यानंतर तो चेंडू काढण्याच्या नादात परवेज खानचा पाय घसरून तो नाल्यात पडला. त्यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. या घटनेच्या माहितीवरून पोलीस आणि शोध बचाव पथकाने परवेज खानचा शोध घेतला. परंतू तो मिळून आला नाही. रात्री अंधार पडल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली होती. सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु झाल्यानंतर परवेज खानचा मृतदेह हातुर्णा येथील नाल्याजवळ दिसून आला.
Powered By Sangraha 9.0