विदर्भ स्तरीय जलतरण स्पर्धेत ब्रम्हपुरीच्या स्पर्धकांची यशस्वी कामगिरी

    17-Jul-2024
Total Views |
- स्पर्धेत 5 पदकाची कमाई

swimming competition 
ब्रम्हपुरी :
स्टार स्पोर्टस अकॅडमी नागपूर व एक्वॅटिक असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 14 जुलै रोजी सकाळी 10 वाजता बुटिबोरी येथील जलतरण तलावात विदर्भ स्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये संपूर्ण विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व अमरावती येथील जवळपास 250 स्पर्धक सहभागी झाले होते.
 
शिवराज मालवी यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हपुरी जलतरण तलाव चे 12 स्पर्धक अंडर 9- गटात- वनश्री कावळे, अरिहंत नगराळे, अंडर -11गटात- निकोल नगराळे, अलेक्स डांगे, ओजस शेंडे, कबिर मेश्राम, अंडर -14 गटात- गार्गी दोनाडकर, श्रद्धा वैद्य, इशिता शेंडे, अंडर -15 गटात कबिर नगराळे, यश चौधरी व ईशांत बावनकुळे असे 12 स्पर्धक सहभागी झाले व आपापल्या गटात यशस्वी कामगिरी करत 5 ब्राँझ मेडल पटकावले व ब्रम्हपुरी जलतरण स्पर्धकांचे नाव विदर्भ स्तरावर पोहचविले, याबद्दल प्रशिक्षक शिवराज मालवी व सर्व जलतरण चमूचे ब्रम्हपुरीकर जनता, न.प.ब्रमपुरी चे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ब्रम्हपुरीच्या डोंगेघाट स्विमिंग क्लबचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढिल यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
स्पर्धेत वनश्री कावळे हिला 50 मिटर फ्रिस्टाइल व 25 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये ब्राँझ मेडल तर अरिहंत नगराळे याला 25 मिटर फ्रिस्टाइल, 50 मिटर फ्रिस्टाइल व 25 मिटर बॅकस्ट्रोक मध्ये ब्राँझ मेडल मिळाले. असे एकूण 5 पदकांची कमाई करत ब्रम्हपुरीच्या जलतरण चमूचे नाव विदर्भ स्तरावर पोहचविले. ही एक अभिमानास्पद बाब कारण ब्रह्मपुरी येथे जलतरण तलाव सुरू केवळ दोन महिने झाले व दोन महिन्याच्या सरावाने उत्कृष्ट कामगिरी करत विदर्भ स्तरावर नाव पोहोचले.