'सखे वेड लागलं' घालतोय यू-ट्यूबवर धुमाकूळ

16 Jul 2024 14:58:16

Sakhe Ved Lagal going viral on YouTube
 
नागपूर :
पहिल्यांदा झालेले प्रेम आणि त्या प्रेमातील गंमतीदार आठवणीवर भाष्य करणारे सखे वेड लागलं हे गाणं सद्या यू-ट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. रिलीज होताच अवघ्या दोन दिवसात हजारो प्रेक्षकांना गाण्याने भुरळ घातली आहे. गाण्याचे बोल आणि सुमधुर संगीत प्रेक्षकांना चांगलेच पसंतीस पडत आहे. विशेष म्हणजे गाण्याचे मुख्य पार्श्वगायक आणि संपूर्ण स्टार कास्ट ही नागपूरचीच आहे.
 
आपल्या शांत आणि अनोख्या शैलीमुळे युवकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या पार्श्वगायक गौरव जयचीत्त यांनी सखे वेड लागलं हे गाणं आवाजबद्ध केलं आहे. नागपूरच्या स्थानिक कलाकारांना घेऊन आलेलं हे गीत प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. पार्श्वगायक गौरव जयचीत्त यांनी हे गाणं गायलं असून संगित देखील त्यांनीच दिलं आहे.
 
युवा गीतकार सूर्यकांत एस हे गाण्याचं गीतकार आहेत. तर नृत्य निर्देशन अयुप परिपगार,तसेच नागपुरी टेक चॅनेलचे नागपूरचे जिजाजी म्हणून प्रसिद्ध असलेले दर्शन दामोदर, इंस्टाग्राम इन्फ्ल्यून्सर कृतिका रामटेके, जयंती मूव्ही ॲक्ट्रेस विभावरी गजभिये यांच्या प्रमूख भूमिका आहेत. गाण्याचे संपूर्ण एडिटिंग हे उद्देश भिवगडे यांनी केलें आहे.
Powered By Sangraha 9.0