मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : आता ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन अर्ज स्वीकारणार

16 Jul 2024 17:21:38

Majhi Ladki Bahin Yojana
 
 
मुंबई :
नुकतेच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (CM Majhi Ladki Bahin Yojana) ही योजनेची घोषणा केली. या घोषणेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत.
 
योजनेची नोंदणी आता 31 ऑगस्टपर्यंत सुरु करण्याची मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी अनेक अटींना सरकारने शिथील केले आहे. अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाची अट देखील सरकारने काढली आहे. आता केवळ रेशनिंग कार्ड दाखविले तरी पुरेसे ठरणार आहे. तसेच आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतला. यातच आता पुन्हा एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.
 
या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्स तयार केले आहे. मात्र वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सवर अर्ज भरताना अडचणी होत आहे.या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0