कृपाल तुमाने यांचे जल्लोषात स्वागत

16 Jul 2024 17:33:32
Kripal Tumane
 (Image Source : Internet)
 
वाडी :
नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने (Kripal Tumane) यांचे नागपूर आगमनप्रसंगी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी हिंगणा, काटोल, सावनेरचे सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे यांनी कृपाल तुमाने यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज होते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमाने यांचे पुनर्वसन केल्याने कार्यकर्त्यात पुन्हा उत्साह संचारला असल्याचे सांगितले.
 
यावेळी आमदार आशीष जयस्वाल, संदीप ईटकेलवार, वासू कोहले, चंद्रहास राऊत, सुरेंद्र गिरी, विनोद सातंगे, शुभम नवले, राज तांडेकर, राजेंद्र गिरडकर, नेहा भोकरे, नरेश मसराम, मंगेश चौरपगार, शुभम राजे इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0