डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार

    16-Jul-2024
Total Views |
Donald Trump
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
अमेरिकेतील रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये पुरेशी प्रतिनिधी मते मिळाल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर झाले आहेत.
 
नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि तिसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे डोनाल्ड ट्रम्प असा सामना बघायला मिळणार आहे.
 
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. या पदासाठी त्यांनी ओहायो येथील रिपब्लिकन सिनेटर जेडी वन्स यांची निवड केली आहे.