AAP च्या कार्यालयासंदर्भात केंद्र सरकारने १० दिवसांत निर्णय घ्यावा

16 Jul 2024 17:52:01
AAP office
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
आम आदमी पक्षाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राजधानी दिल्लीत पक्षाचे कार्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे जमीन देण्याची विनंती केली आहे. आम आदमी पक्षाच्या याचिकेवर सुनावणी झाली. आम आदमी पक्षाला कार्यालय बांधण्यासाठी जमीन देण्याच्या विनंतीवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला १० दिवसांत निर्णय घेण्यास सांगितले. सध्या आपचे कार्यालय दीनदयाल उपाध्याय रोड येथे आहे.
 
याप्रकरणी पुढील सुनावणी २५ जुलै रोजी होणार असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. आम आदमी पक्षाच्या विनंतीवर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जून रोजी झालेल्या सुनावणीत सांगितले की, आम आदमी पार्टी ला इतर पक्षांप्रमाणेच दिल्लीत पक्ष कार्यालय मिळण्याचा अधिकार आहे. त्यावेळी केंद्र सरकारला या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी ६ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती, त्यानंतर आज पुन्हा सुनावणी झाली.
Powered By Sangraha 9.0