उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री होवोत हीच इच्छा; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे विधान

15 Jul 2024 18:05:52

Shankaracharya Avimukteswarananda
 (Image Source : x/@ShivSenaUBT_)
 
मुंबई :
बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya Avimukteswarananda) यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीनंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच त्यांनी भेटीमागचे कारण सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झाल्याचे सांगून दुःख व्यक्त केले. उद्धव ठाकरे लवकरच पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होवोत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
 
 
 
उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर आज मी मातोश्रीवर आलो. आम्हीही त्यांच्याबरोबर झालेल्या विश्वासघातासाठी सहवेदना व्यक्त केल्या. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही. तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही, असे मी त्यांना म्हणाल्याचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

हेही वाचा : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरेंची घेणार भेट


 
 
Powered By Sangraha 9.0