कुकडिकापा धबधब्यात बुडून नागपूरच्या तरुणाचा मृत्यू

    15-Jul-2024
Total Views |
Tragic Death of Youngster in kukdi khapa waterfall
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
पावसाळा सुरु झाल्याने सर्व पर्यटकांना सध्या पाण्याचे ठिकाण असलेल्या स्थळी जाण्याची ओढ लागली आहे. पण हे पाण्याचे ठिकाण सुंदर असले तरी तेथे धोकाही तितकाच आहे, याची जण असतानाही काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. अशातच छिंदवाडा येथील कुकडीखापा धबधब्यात धक्कादायक घटना घडली आहे.
 
उमरानाला परिसरात येणाऱ्या कुकडीखापा धबधब्यात पर्यटनासाठी गेलेल्या नागपुरातील एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. धबधब्यावर अंघोळ करत असताना त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. हिमांशू मनोहर असे मृत मुलाचे नाव असून अंघोळ करताना तो खोल पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
 
 
 
मिळालेल्या माहितनुसार, हिमांशू आणि त्याचे सहा मित्र रविवारी सहलीला गेले होते. मात्र, धबधब्याचा आनंद घेत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या मित्रांनी त्याचा जीव वाचवण्याचे अथक प्रयत्न केले. पण तो वाचू शकला नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोक व्यक्त केला जात आहे. हिमांशूच्या आकस्मिक आणि दु:खद निधनाने त्याचे मित्र आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
 
या घटनेबाबत स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास करत आहेत.