अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरेंची घेणार भेट

15 Jul 2024 16:25:55

Shankaracharya Avimukteshwaranand will meet Uddhav Thackeray
(Image Source : Internet) 
 
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्या येथे भव्य राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. मात्र या प्राणप्रतिष्ठापणेला उत्तराखंड ज्योतिष पीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला. आता हेच शंकराचार्य स्वामी आज 15 जुलै रोजी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणार यासंदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
 
दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपा नेत्यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून कसे लांब गेलेत असे ते सातत्याने म्हणत असतात, याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Powered By Sangraha 9.0