PM मोदींनी गाठला X वर 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा

15 Jul 2024 15:48:04
PM Narendra Modi
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नावावर आणखी एक कामगिरी नोंदवण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सध्याचे X अर्थात पूर्वीच्या ट्विटर या समाजमाध्यमावर 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी फॉलोअर्स झाले आहेत.
 
यासह पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (38.1 दशलक्ष अनुयायी), दुबईचा शासक शेख मोहम्मद (11.2 दशलक्ष अनुयायी) आणि पोप फ्रान्सिस (18.5 दशलक्ष अनुयायी) यांसारख्या जागतिक नेत्यांना मागे टाकत सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेता बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील 3 वर्षात 3 कोटी लोकांची भर पडली आहे.
 
काय म्हणाले पंतप्रधान
 
माध्यमावरील चर्चा, वादविवाद, विचार, नागरिकांच्या शुभेच्छा आणि ग्राह्य धरावेत अशा टीका यांची दखल घेणे हा आनंददायी अनुभव असून भविष्यातही संवादाचे हे माध्यम असेच साथ देत राहील, असे मोदी यांनी आपल्या X संदेशात म्हटले आहे.
 
 
 
कोणाचे किती फॉलोअर्स?
 
पंतप्रधान मोदी यांची भारतातील राजकारण्यांच्या तुलनेत फॉलोअर्सची संख्या खूप जास्त आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे 26.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 27.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदी हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (19.9 दशलक्ष), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (7.4 दशलक्ष), राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद आणि NCP (SP) प्रमुख शरद पवार (2.9 दशलक्ष) यांसारख्या इतर विरोधी नेत्यांपेक्षा मैलांच्या पुढे आहेत.
Powered By Sangraha 9.0