ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल; मुलाने सांगितले कारण

    01-Jul-2024
Total Views |
Shatrughna Sinha Admitted to Hospital
 (Image Source : Internet/ Representative)
 
मुंबई :
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा नुकतीच झहीर इक्बालसोबत आंतरधर्मीय विवाह बंधनात अडकली आहे. मात्र, मुलीचे लग्न झाल्याच्या काही दिवसांनीच वडील शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांचा मुलगा लव सिन्हा याने या बातमीची पुष्टी देखील केली आहे. शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत विविध गोष्टी बोलल्या जात होत्या. मात्र, त्या सर्व चर्चांवर विराम लावत मुलगा लव सिंहने वाहिलांची प्रकृती खालावल्याचे खरे कारण सांगितले.
 
लव सिन्हा याने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते काही दिवसांपासून विषाणूजन्य ताप आणि अशक्तपणाने त्रस्त होते, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लव म्हणाला, 'माझ्या वडिलांना खूप ताप होता आणि आम्ही त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला जेणेकरून ते बरे व्हावे आणि आम्ही त्यांची वार्षिक तपासणी देखील करू शकू.'
 
सोनाक्षी आणि झहीर यांनी घेतली वडिलांचे भेट
 
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी शत्रुघ्न सिंह यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी या जोडप्याची कार मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसली असून त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता.
काही रिपोर्ट्सनुसार, शत्रुघ्न सिन्हा हे २५ जून रोजी डायनिंग हॉलमध्ये घसरले होते. त्यामुळे त्यांना बारगड्यांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या होत्या. त्यांच्या डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यावर नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे बोलले जात आहे.