(Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क :
गुगलची विश्वसनीय भाषांतर सेवा 'गुगल ट्रान्सलेट' (Google Translate) ने पुन्हा एकदा आपले आतापर्यंत 233 भाषांमध्ये भाषांतराची सुविधा देणाऱ्या गुगलने आता 110 नवीन भाषा जोडून मोठी झेप घेतली आहे.
गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने आता जगातील 243 भाषांचे भाषांतर करणे शक्य झाले असून, भारतीयांना स्वारस्य असणारी गोष्ट म्हणजे सात भारतीय भाषा/बोलींचा नव्याने समावेश करण्यात आलेल्या भाषांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोणत्या भारतीय भाषा/बोलींचा समावेश आहे?
गुगल ट्रान्सलेट मध्ये अवधी, बोडो, खासी, कोकबोरोक, मारवाडी, संताली आणि तुळू या सात भारतीय भाषा/बोली समाविष्ट आहेत. त्यामुळे करोडो भारतीयांचा नवा वर्ग आता गुगल ट्रान्सलेटची सुविधा वापरू शकणार आहे, असे म्हणता येईल.
गुगल ट्रान्सलेट भाषा प्रेमींना नवीन भाषा शिकण्यासाठी मोफत भाषांतराची सुविधा उपलब्ध करून देते. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेली व्यक्ती या सेवेचा लाभ घेऊ शकते. Google ही सुविधा भविष्यात अधिक भाषांमध्ये/बोलींमध्ये प्रदान करेल.
नोव्हेंबर 2022 मध्ये, गुगलने गुगल ट्रान्सलेट अंतर्गत जागतिक स्तरावर 1000 सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा/बोलींचा समावेश करण्याची घोषणा केली. हा टप्पा गाठण्यासाठी सध्या 110 नवीन भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या सेवेद्वारे, गूगल जागतिक भाषा आणि प्रादेशिक बोली यांच्यातील दरी कमी करण्याचे महत्त्वपूर्ण आणि प्रशंसनीय काम करत आहे.