...तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला माहीत; सुप्रिया सुळेंचा इशारा

    08-Jun-2024
Total Views |

Supriya Sule warns people in opposition
 (Image Source : Internet)
 
बारामती :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. तर शरद पावार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली. यात सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून दणदणीत विजय मिळवत सुनेत्रा पवार यांना पराभूत केले. अशात सुप्रिया सुळे या विजयाच्या सभा घेत आहेत. खडकवासला या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या सभेत धमक्या देणाऱ्यांना इशारा दिला.
 
लोकसभा निवडणुकीदरम्यान काही लोक बारामती मतदारसंघात धमक्या देत फिरत होते. माझं एकावर तर फारच लक्ष आहे. मी वाटच बघते आहे तो परत कधी धमकी देतो. तो कुठे राहतो याचा पत्ता मला माहीत नाही. अर्ध्यावेळी नावही लक्षात राहात नाही. पण मला माणूस लक्षात आहे. सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कुणी दिला तर त्या व्यक्तीने दिला आहे. मी तेव्हा उमेदवार होते आता मी खासदार आहे.
 
बारामती लोकसभा मतदारसंघात असले लोक फिरत असतील तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला माहीत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला दिलेली धमकी मी खपवून घेणार नाही. ज्याला कुणाला कळलं असेल त्याला कळलं असेल. आता कुणाचं काही करायची गरज नाही. जे उत्तर आपण द्यायची गरज होती ते उत्तर मतदारांनीच त्यांना दिले आहे, असा घणाघात सुळे यांनी केला.