'या' दोन मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात होण्याची शक्यता

08 Jun 2024 13:34:40

Possibility of staff reduction in these two big companies
(Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
विदेशातील काही मोठ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांतून कर्मचारी कपातीचे सत्र सुरूच आहे. यात आता गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन मोठ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या विभागातील एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याचे सांगितल्या जात आहे.
वृत्तसंस्थांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार,गुगलने त्याच्या क्लाऊड विभागामधील १०० कर्मचाऱ्यांना नारळ दिले आहे, तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने एक हजार कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेतले आहेत. गुगलने त्यांच्या 'गुगल क्लाऊड' या विभागातून सेल्स आणि इंजिनिअरिंग या विभागातील कर्मचारी कमी केले आहेत. कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १०० असल्याचे सांगण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टने मिक्स रिअॅलिटी विभागातून एक हजार कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे.
Powered By Sangraha 9.0