बच्चू कडू यांच्या 'या' घोषणेने महायुतीसह रवी राणांची डोकेदुखी वाढणार

    08-Jun-2024
Total Views |

bachu kadus announcement will increase the headache of ravi rana along with mahayuti
 
अमरावती :
महायुतीत मित्रपक्ष असणाऱ्या प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार उभा केला. त्यामुळे मतांची विभाजन होऊन नवनीत राणा पराभूत झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी आता एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 20 ते 25 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत. पण राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार देणार आहोत. याशिवाय बडनेरा विधानसभा मतदारसंघातही उमेदवार देणार आहोत, अशी घोषणा कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.
 
बच्चू कडू यांच्या घोषणेमुळे रवी राणा आणि महायुती सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. कारण रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय कडू यांनी जाहीर केला आहे.