राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती ईडीकडून रद्द

    07-Jun-2024
Total Views |

NCP leader Praful Patel
 
 
नागपूर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (NCP leader Praful Patel) यांची 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती ईडीकडून रद्द करण्यात आली आहे. हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा मनाला जातो. PMLA कायद्यांतर्गत वरळीये थील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅट ईडी जप्त करणार होती. यापूर्वी ईडीने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते. गॅंगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप केला होता. सोमवारी याबाबत ईडीने ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचा दावा करत जप्ती रद्दी केली आहे.
 
दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या ज्या मालमत्तेवर कारवाई केली होती त्यातील दोन मजले इक्बाल मिर्ची यांच्या कुटुंबियांचे होते. त्यांना ईडीने जप्त केले होते. ही मालमत्ता व्यावसायिक कामांसाठी उपयोगता होती. प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होता की, त्यांनी इक्बाल मिर्चीशी करार करुन ही संपत्ती खरेदी केली. ईडीच्या दाव्यानुसार हा करार 2007 मध्ये झाला होता. मात्र, आता ईडीने प्रफुल्ल पटेल यांची जप्त केलेली संपत्ती परत केल्याची माहिती समोर येत आहे.