3,875 वाहन चालकांवर कारवाई

    07-Jun-2024
Total Views |

action against 3 875 motorists
(Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण 3,875 वाहन चालकांवर कारवाई करून 4,74,850 रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे शहर पोलिसांनी महाराष्ट्र दारू बंदी कायद्यान्वये 2 प्रकरणात 2 आरोपींवर कारवाई करून 35,800 रुपयांचा माल जप्त केला. तसेच जुगार कायद्यान्वये 4 प्रकरणात 4 आरोपींवर कारवाई करून 17,265 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलिसांतर्फे राबविण्यात आली. या पुढेही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.