Nagpur : कामठी परिसरात कुख्यात गुन्हेगाराची १३ वर्षाची मुलगी गर्भवती

    07-Jun-2024
Total Views |
- आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

13 year old girl pregnant in Kamthi area of Nagpur
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
शहरातील कामठी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी कुख्यात गुन्हेगाराची १३ वर्षीय मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
 
अचानक अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरांकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीला विचारले असता तिने काहीही सांगण्यास नकार दिल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
 
माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याचे तिने आपल्या आजीला सांगितले. आजीने तिला डॉक्टरांकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे माहिती झाले. मात्र आजीला यावर विश्वास बसला नाही. ३ जूनला मुलीने पोट दुखत असल्याचे तिच्या आईला सांगितले. आईने जरीपटक्यातील एका डॉक्टरकडे नेले असता तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर अहवालात मुलगी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याने आईला मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी मुलीचे वय लहान असल्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. मात्र मलगी आणि तिच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. पोलिसांनी काही संशयितांची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीवर जवळच्या नातेवाईक मुलानेच बलात्कार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.