एअर इंडियाने सुरू केलेली फेअर लोक सेवा म्हणजे नेमकं काय?

    05-Jun-2024
Total Views |

Air India starts fair lock system
 
 
एबी न्यूज नेटवर्क :
एअर इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी फेअर लोक ही सेवा सुरू केली आहे या नव्या सेवेमुळे प्रवाशांना काही अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया एअर इंडियाने सुरू केलेली फेअर लॉक सेवा म्हणजे नेमकी काय आणि ती कसे कार्य करेल.
 
एअर इंडियाने सुरू केलेल्या सेवेला 'फेअर लॉक' असे नाव देण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. एअर इंडियाने आपल्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर तिकीट बुकिंग प्रक्रियेत 'फेअर लॉक' हे नवीन वैशिष्ट्य समाविष्ट केले आहे. यात प्रवासी त्यांच्या आवडीचे फ्लाइटचे भाडे कमी शुल्कात 48 तासांसाठी आरक्षित करू शकतील, जेणेकरून त्यांना शेवटच्या क्षणी तिकीट बुक करताना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाही.
 
मीडिया रिपोर्ट नुसार भाडे लॉकचा लाभ घेण्यासाठी, एअर इंडियाच्या प्रवाशांना त्यांच्या पसंतीचे फ्लाइट निवडणे आवश्यक आहे. यानंतर बुकिंग प्रक्रियेदरम्यान फेअर लॉकचा पर्याय निवडावा लागेल. आता एकवेळ नॉन रिफंडेबल फी भरावी लागणार आहे.
 
त्यानंतर, वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवर ‘बुकिंग व्यवस्थापित करा’ पर्याय निवडून तुम्ही निवडलेल्या भाड्यावर तुमच्या बुकिंगची पुष्टी करू शकता.