मराठमोळ्या आयुषी भावेची हिंदी मालिकेत एंट्री! '१०:२९ की आखरी दस्तक'साठी तयार!

    04-Jun-2024
Total Views |

Marathi Actress Ayushi Bhave enters in Hindi serial
 
 
मुंबई :
मराठमोळ्या नायिका सध्या हिंदी मालिकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अशाच मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक आयुषी भावे लवकरच नव्या हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टार भारतवरील आगामी '१०:२९ की आखरी दस्तक' या शोमध्ये ती बिंदू ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहे. याबाबत तिने आपल्या नव्या शोबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. 

शोमधील आपल्या पात्राबद्दल काही सांगा?
मी या नव्या शोमध्ये बिंदूची भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. बिंदू एक रहस्यमय महिला आहे. जसे कांदा सोलल्यावर त्याचे अनेक परत असतात, तसंच प्रेक्षकांना हळूहळू या रहस्यमय पात्राचे अनेक स्तर समजतील. हे खूपच रंजक ठरणार आहे.
 
तुम्ही राजवीरसोबत तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहात. तुमची ट्यूनिंग कशी आहे?
हे आश्चर्यकारकच आहे! मला वाटते की आमचे तारे जुळले आहेत. माझे टेलिव्हिजनवर पदार्पण सुद्धा त्याच्यासोबतच झाले आणि आता सलग तिसऱ्या शोमध्येही आम्ही एकत्र काम करत आहोत. हे एक हॅट्रिक आहे! जसजशे आम्ही एकमेकांना ओळखत गेलो तसतशी आमची मैत्री सुद्धा वाढली आहे.
 
तुम्ही या शो ला होकार का दिला?
ह्या शोचे कथानक खूपच अनोखे आहे. स्क्रिप्ट रोचक आहे आणि पात्रे हि आकर्षक आहेत, आणि हा शो निश्चितच काहीतरी वेगळं घेऊन आला आहे जे मी आधी कधीच केलेले नाही आहे. त्यामुळे माझे शोला होकार देणे स्वाभाविकच होते!
 
तुमच्या पूर्वीच्या भूमिकांपेक्षा या भूमिकेत काय वेगळं आहे?
माझ्या पूर्वीच्या भूमिकेत आणि ह्या भूमिकेत जमीन-आसमानाचा फरक आहे! बिंदू चे पात्र, मी ह्या पूर्वी साकारलेल्या पात्रांपेक्षा नक्कीच खूप वेगळी आहे. हे एक टिपिकल सासू-सुनेची मालिका नाही आहे आणि त्यामुळे ह्या मालिकेतील पात्रे पूर्णपणे एका वेगळ्या वातावरणात आहेत, आणि मी कधीच सुपरनॅचरल/थ्रिलर जॉनरचा भाग झाले नव्हते.
 
तुम्ही आपल्या पात्रात उतरण्यासाठी कोणतीही तयारी किंवा कार्यशाळा घेतली का?
प्रोजेक्टच्या प्रारंभिक टप्प्यात आम्ही टीम म्हणून काही वाचनाचे व्यायाम केले. परंतु डेली सोप करण्याची सुंदरता म्हणजे प्रत्येक दिवस एक नवा दिवस, नवी स्क्रिप्ट आणि एक नवे आव्हान असते. हे एक अभिनेता म्हणून निश्चितच रोमांचक आहे.
 
तुम्हाला अलौकिक गोष्टींवर विश्वास आहे का? तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?
माझा नक्कीच ऊर्जांवर विश्वास आहे आणि बालपणात माझ्या आजोबांकडून अनेक कथा ऐकल्या आहेत. पण अजूनपर्यंत मला असा काही अनुभव आलेला नाही.
 
तुमच्या मते आजच्या टीव्ही प्रेक्षकांना सुपर नॅचरल शोजची मागणी आहे का?
मला वाटते लोकांना हे खरोखर आवडते! हे पाहायला मजा येते आणि हे कसेतरी प्रेक्षकांना शो बरोबर जोडून ठेवते.
 
शोमधील तुमच्या लुकबद्दल काही सांगा?
सिझलिंग हा शब्द माझ्या मनात आला! माझी स्टायलिस्ट शिवानी शिराळीने नक्कीच मला या नवीन अवतारात खूपच हॉट बनवले आहे!